औरंगाबादकरांना मिळणार पंकज उदास यांच्या गझलांची मेजवानी

Foto

औरंगाबाद- शहराच्या सांस्कृतिक परंपरेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'स्वरझंकार संगीत महोत्सवाचे' नववे पर्व ८ आणि ९ डिसेंबर रोजी प्रोझोन मॉलच्या लॉन्सवर रंगणार आहे. पुण्याच्या व्हायोलिन अकॅडमी आणि धूत ट्रान्समिशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पद्मश्री पंकज उदास यांच्या आवाजातील गझल तर आनंद भाटे, राकेश चौरासिया, अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय संगीताचा आस्वाद औरंगाबादकरांना घेता येणार आहे.

स्वरझंकार संगीत कार्यक्रमाची सुरुवात ८ डिसेंबर रोजी आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल, बालपणीच गंधर्व गायकीचे शिक्षण घेतलेले आनंद आता 'आनंद गंधर्व' म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. बासरीवादक राकेश चौरासिया प्रथमच औरंगाबाद शहरात येणार आहेत. पहिल्या दिवसाचा महोत्सवाची सांगता अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. दुसऱ्या दिवशी पंकज उदाज यांच्या गझलांचा आस्वाद औरंगाबादकरांना घेता येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व्हायोलिन अकॅडमीचे पंडित अतुलकुमार उपाध्ये राजस उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.